-
About
-
Programmes
-
Admissions
-
Student Life
About
Programmes
-
Masters
-
Diploma
-
Certificates
मराठी भाषा, साहित्य आणि उपयोजित मराठी
उपयोजित आणि व्यवसायाभिमुख मराठीवर लक्ष केंद्रित करणारा आमचा पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रस्थापित आणि समकालीन दृष्टिकोनांच्या मिश्रणातून साकार झाला आहे. तो केवळ साहित्यापलीकडे जाऊन अनुवाद, संपादन, सामग्री निर्मिती आणि भाषा अध्यापन यासारख्या क्षेत्राकरता उपयुक्त व्यावहारिक कौशल्यांच्या विकासावर भर देतो.
पहिली आणि दुसरी भाषा म्हणून मराठीच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती या विषयाचा समावेशही या अभ्यासक्रमात असल्याने हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श पर्याय ठरतो. उपयोजित कौशल्ये, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनासह अध्ययन, संशोधनास प्रोत्साहनआणि मराठीशी निगडीत क्षेत्रांतील प्रत्यक्ष कार्यानुभव यामुळे हा अभ्यासक्रम पारंपरिक अभ्यासकमापेक्षा वेगळा ठरतो.
अभिजात मराठीच्या विकासाच्या दिशांवर लक्ष केंद्रित करून मराठी भाषा आणि साहित्याबद्दलचे कुतुहल आणि जिज्ञासा निर्माण करतो.
मराठी भाषा, साहित्य आणि कला यांच्या अभ्यासास प्रेरणा: विद्यार्थ्यांना मराठी साहित्यातील विविध साहित्यप्रकार, कालखंड आणि सांस्कृतिक संदर्भ यांचे सखोल ज्ञान प्राप्त होईल. ते मराठीतील विविध साहित्याप्रकारातील साहित्यकृतींची समीक्षा, विश्लेषण व अर्थनिर्णयन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त करतील. विविध कला आणि साहित्य यांचे स्वरूपविशेष समजून घेतील.
अनुवाद कौशल्यातील प्रावीण्य: विद्यार्थ्यांना मराठी आणि इतर भाषांमधील साहित्याचा, सांस्कृतिक संदर्भांसह अनुवाद करण्याचे व्यावसायिक पातळीवरील कौशल्य प्राप्त होईल.
संशोधन करण्यासाठी आवश्यक मर्मदृष्टींचा विकास: विद्यार्थी मराठी साहित्य व अनुवाद क्षेत्रात स्वतंत्र संशोधन करण्यास सक्षम होतील. योग्य संशोधन पद्धतींचा वापर करून शोधनिबंध, समीक्षात्मक लेख आणि अकादमिक स्वरूपाचे लिखाण करण्यास आवश्यक कौशल्ये विद्यार्थी प्राप्त करतील.
सांस्कृतिक व भाषिक संवेदनशीलता: साहित्य, समाज आणि संस्कृती यांचे अनुबंध समजून घेण्यासाठी आवश्यक संवेदनशीलता विद्यार्थी प्राप्त करतील.
सर्जनशील लेखन क्षमता: विद्यार्थी मराठी भाषेतील विविध साहित्याप्रकारांतील सर्जनशील अभिव्यक्ती करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करतील.
प्रभावी संवाद कौशल्ये: विद्यार्थी स्पष्ट, सुसंगत आणि प्रभावी पद्धतीने आपले विचार व संकल्पना इतरांपुढे मांडण्यास सक्षम बनतील.
सामाजिक आणि ऐतिहासिक जाणिवांची जडणघडण: मराठी भाषा व साहित्याला घडविणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भांची समग्र समज विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल. हे घटक आधुनिक काळातील प्रश्नांना कसे प्रभावित करतात, याचे भानही त्यांच्यामध्ये निर्माण होईल.
मराठी भाषा, साहित्य आणि उपयोजित मराठीमध्ये एम.ए. कार्यक्रम भिन्नता
मराठी भाषा आणि साहित्याचे प्रगत ज्ञान
समालोचनात्मक विचार आणि विश्लेषणात्मक कौशल्ये
संशोधन आणि अभ्यासपूर्ण लेखन
उपयोजित मराठी कौशल्ये
सांस्कृतिक क्षमता, ऐतिहासिक आणि सामाजिक जाणीव
सर्जनशील लेखन आणि अभिव्यक्ती
आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन
मराठीला अभिजात भाषा म्हणून संशोधन
इंटर्नशिप आणि उद्योग एक्सपोजर
संशोधनाच्या संधी
मराठी भाषा, साहित्य आणि उपयोजित मराठीमध्ये एम.ए. साठी करिअरच्या संधी
शैक्षणिक क्षेत्र
शालेय स्तर (वी.एड नंतर)
महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तर संशोधक
शैक्षणिक विषयवस्तू लेखक
प्रसारमाध्यमे
वार्ताहर / बातमी संपादक
टीव्ही, आकाशवाणी व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी लेखक
भाषांतर व अनुवाद क्षेत्र
अनुवादक (सरकारी व खाजगी क्षेत्र)
स्वतंत्र साहित्यिक अनुवादक
डबिंग तज्ज्ञ
प्रकाशन व सर्जनशील लेखन
लेखक / कवी / निबंधकार
संपादक, मुद्रितशोधन
साहित्यिक समीक्षक
रंगभूमी, चित्रपट व सांस्कृतिक संस्था
वाहिन्यांसाठी लेखन / गीतकार
सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक
कला, संस्कृती व साहित्य प्रकल्पांमध्ये संशोधक
डिजिटल कंटेंट व ई-लर्निंग
हिंदी कंटेंट निर्माता / ब्लॉगर / इन्फ्लुएंसर
ई-लर्निंग प्लॅटफॉर्मसाठी भाषा तज्ज्ञ
एसईओ लेखक (हिंदी डिजिटल माध्यमांवर)
Duration: 2 years PG Programme
Total Credits: 80 credits
| Semester- 1 | Semester -2 |
|---|---|
| अ. प. 1- भाषा आणि पायाभूत भाषिक कौशल्ये | अ. प. 7-भाषा आणि प्रगत भाषाकौशल्ये |
| अ. प. 2-महाराष्ट्रीय समाज आणि मराठी साहित्य- एक | अ प. 8-महाराष्ट्रीय समाज आणि मराठी साहित्य-दोन |
| अ. प. 3-संशोधन आणि संदर्भसाधने | अ. प 9- संशोधन आणि संशोधनपद्धती |
| अ. प. 4-भाषांतरविद्या | अ. प. 10- भाषांतरकौशल्ये |
| अ. प. 5-ललित कला आणि साहित्य - एक ( किंवा ) elective | अ. प. 11- ललित कला आणि साहित्य-दोन ( किंवा ) elective |
| अ. प. 5 मराठीतील वैचारिक आणि ललित गद्य elective | अ. प. 11 - मराठी नाटक आणि रंगभूमी elective |

Prof Veena Sanekar
Dean and professor, K J Somaiya School of Languages and Literature, Somaiya Vidyavihar University, Mumbai
We are happy to answer all your admission related enquiries. Fill out the form and we will be in touch with you shortly.
We acknowledge the receipt of your enquiry. Our team will get back to you shortly.